नवी दिल्ली – दिल्लीतील मटियाला येथील आम आदमी पक्षाचे आमदार गुलाबसिंह यादव यांना पक्षाची बैठक सुरू असताना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यानंतर आमदारांनी बैठक सोडून पळ काढला तर कार्यकर्ते त्यांना मारण्यासाठी त्यांचा पाठलाग करत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून आम आदमी पक्षाने अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
In Delhi, AAP MLA Gulab Singh Yadav gets beaten up & later he runs away to save his life
People who attacked him are none other than AAP workers
AAP workers did it because AAP MLA was involved in corruption! pic.twitter.com/knIvWRAHLg
— Mahesh Vikram Hegde 🇮🇳 (@mvmeet) November 21, 2022
बैठक सुरू असताना अचानकच आपच्या कार्यकर्त्यांनी यादव यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. अखेर त्यांनी तेथून धूम ठोकली तरी कार्यकर्ते त्यांच्या मागे धावत होते. या प्रकारानंतर दिल्ली महापालिका निवडणुकीत आपशी थेट लढत असलेल्या भारतीय जनता पार्टीला चांगलाच मुद्दा हाती लागला आहे.
प्रामाणिकपणाचे राजकारण करण्याच्या नाटकात व्यस्त असलेल्या आपच्या भ्रष्टाचाराला त्यांचेच कार्यकर्ते इतके वैतागले आहेत की त्यांनी आमदाराला सोडले नाही. तिकिट विकल्यामुळेच कार्यकर्त्यांनी त्यांना पळवून पळवून मारले. तसेच आपच्या सगळ्याच आमदारांचा एक दिवस असाच नंबर लागणार आहे, असे भाजपने म्हटले आहे.
Maharashtra : पोषक वातावरणामुळे राज्यात उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ – उपमुख्यमंत्री फडणवीस
दरम्यान, या सगळ्या घडामोडीनंतर गुलाबसिंह यादव यांनी ट्वीट करून भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. भाजपचे आरोप खोटे आहेत. मी आता पोलीस ठाण्यात आहे व भाजपच्या उमेदवाराला वाचवण्यासाठीच येथे आलो असल्याचा दावा त्यांनी केला आहे.