वॉशिंग्टन – आधुनिक काळात जीपीएस प्रणाली म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम हे एखादे ठिकाण निश्चित करण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचण्यासाठी महत्त्वाची मानण्यात येते नवीन काळात माणसाने ही सिस्टीम आपल्या सोयीसाठी शोधली असली तरी पक्षांमध्ये मात्र नैसर्गिकपणे ही सिस्टीम कार्यरत असल्याचे एका संशोधनानंतर उघडकीस आले आहे पक्षी जेव्हा आकाशातून उडत असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात तेव्हा आपोआपच त्यांच्याकडून ही जीपीएस सिस्टीम सुरू होते आणि निश्चित ठिकाणी पोहोचल्यानंतर ही जीपीएस सिस्टीम बंद होते पक्ष्यांच्या डोळ्याशी ही नैसर्गिक जीपीएस सिस्टीम जोडण्यात आली आहे.
पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी ही त्याचा संबंध आहे पक्ष्यांच्या मेंदूमध्ये क्लस्टर एन नावाचा एक घटक असतो या क्लस्टर एनच्या साह्याने पक्षांना चुंबकीय क्षेत्राचा आवाका लक्षात येतो आणि त्या आधारे ते आकाशात दिशा न चुकता उडत असतात कॅनडातील वेस्टर्न ओंटेरिओ युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेतील बॉलिंग ग्रीन स्टेट युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे क्लस्टर एनच्या माध्यमातून जीपीएस सिस्टिम ऍक्टिव्ह झाल्यानंतर पक्षी इप्सित स्थळी योग्य प्रकारे पोचू शकतात असे या संशोधनात म्हटले आहे हे संशोधन युरोपियन जर्नल ऑफ न्यूरोसायन्स या आघाडीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
यापूर्वी सुद्धा आकाशातून उडताना दिशेचा अंदाज घेण्यासाठी पक्षी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करत असल्याचे सांगण्यात आले होते आता या संशोधनाच्या माध्यमातून त्याला पुष्टी मिळाली आहे या दोन विद्यापीठाच्या संशोधकांनी एका छोट्या चिमणीवर प्रयोग करून हे निष्कर्ष समोर आणले आहेत पृथ्वीच्या केंद्रातील चुंबकीय क्षेत्र जरी माणसाला जाणवत नसले तरी पक्षी आणि जनावरे यांच्यासाठी मात्र त्याची जाणीव होत असते असे या संशोधनात म्हटले आहे.