नवी दिल्ली – संसद (Parliament) कर्मचाऱ्यांच्या नवीन गणवेशावर भाजपचे निवडणूक चिन्ह “कमळ’ छापले जात असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने भाजपवर टीकेची झोड उठवताना त्यांनी “संसदेला (Parliament) एकतर्फी आणि पक्षपाती गोष्ट” बनवल्याचा आरोप केला आहे. लोकसभेतील कॉंग्रेसचे व्हिप मणिकम टागोर यांनी कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरील कमळ चिन्हाला जोरदार आक्षेप घेतला आहे.
फक्त कमळ का? मोर का नाही किंवा वाघ का नाही? असा सवाल त्यांनी ट्विटरवर विचारला आहे. सरकार वाघाला संसदेच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर घालण्यास का तयार नाही, कारण वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे. मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. निदान त्याचा तरी या गणवेशावर वापर करायचा,
पण त्यांनी मुद्दाम गणवेशावर कमळ ठेवण्याचा निर्णय घेतला. भाजपने हेच काम जी 20 च्या लोगोमध्येही केले होते. भारतीय संसदेला भाजपच्या पक्ष चिन्हाचा भाग बनवला जाऊ नये, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. भाजपने देशातील प्रत्येक संस्थेच्या कार्यात असा हस्तेपर हस्ते हस्तक्षेप चालवला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.