कोरोना विषाणूंच्या साथीमुळे कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमध्ये वेदनाशामक म्हणून वापरले जाणाऱ्या पॅरिसिटीमॉलची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे. चीनमध्ये या औषधांचे उत्पादन थांबल्यामुळे हा परिणाम झाल्याचे वृत्त ब्लूमबर्ग या संकेतस्थळाने दिले आहे. त्यासोनत अनेक प्रतिजैविकांच्या किंमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे.
ऍझीथ्रोमायसिन या जंतूसंर्गावरील औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या प्रतिजैविकाची किंमत सुमारे 70 टक्क्यांनी वाढली आहे. झायडस कॅडीला कंपनीचे अध्यक्ष पंकज आर पटेल म्हणाले, जर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरवठा सुरळीत झाला नाही तर औषध कंपन्यांना तयार औषधांचा तुटवडा एप्रिलच्या सुरवातीपासून जाणवू लागेल. सामान्य औषधांमध्ये भारत हा जगातील मोठा पुरवठादार आहे. अमेरिकेत पुरवल्या जाणाऱ्या औषधांच्या 12 टक्के वाटा भारतीय कंपन्यांचा आहे. देशातील औषधनिर्मिती 80 टक्के चीनमधील कच्च्या मलावर अवलंबून असते.
कोरोनाच्या साथीमुळे चीनमध्ये सुमारे दीड हजार जणांचा बळी घेतला असून जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था त्यामुळे अडचणीत आली आहे. जगात सुमारे 71 हजार जणांना कोरोना विषाणूंची बाधा झाली आहे. त्यात सर्वाधिक बाधीत चीनमधील आहेत.