नवी दिल्ली : मरियम्मा बालामुरूगन हिच्या दोन गोलच्या जोरावर भारताच्या १७ वर्षाखालील महिलांच्या संघाने रोमानियाविरूध्दची मैत्रीपूर्ण फुटबाॅल लढत ३-३ अशी बरोबरीत सोडविली.
FT: Romania score ⚽⚽ late to earn a draw against India 🇮🇳 U17 Women's National Team.
IND 3️⃣-3️⃣ ROM#INDROM ⚔️ #IndianFootball ⚽ #ShePower 👧🏻 #BackTheBlue 💙 pic.twitter.com/3fPJanAA2o
— Indian Football Team (@IndianFootball) February 16, 2020
भारतीय संघाकडून मरियम्मा बालामुरूगन हिने ४० व्या आणि ५७ व्या मिनिटाला असे दोन गोल केले तर सुमतीकुमारीने ६३ व्या मिनिटाला तिसरा गोल केला.
रोमानिया संघाकडून बोरोडी एडिना हिने ४५ व्या आणि ८३ व्या मिनिटाला असे दोन गोल केले तर मिरिया रोक्साना हिने ७८ व्या मिनिटाला एक गोल केला.
दोन्ही संघातील दूसरा मैत्रीपूर्ण फुटबाॅल लढत बुधवारी होणार आहे.