23 वर्षांपूर्वी आलेल्या “पापा कहते है’ या सिनेमाची हिरोईन मयूरी कांगो सध्या गुगलमध्ये काम करते आहे. तिला गुगलने इंडिया इंडस्ट्री- एजन्सी पार्टनरशीप हेड बनवले आहे. “पापा कहते है’मधील “घऱ् से निकलते ही’ या गाण्यावरून मयूरीला लक्षात ठेवले गेले आहे. त्या सिनेमात तिच्याबरोबर जुगल हंसराज हिरो होता. सिनेमातील करिअर मयूरीसाठी फारसे लाभदायक ठरले नाही. तिने 15 सिनेमे आणि काही सिरीयल पण केल्या. त्यानंतर तिने बॉलिवूडला अलविदा केला. न्यूयॉर्क बिजनेस स्कूलमधून पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेतल्यावर तिने कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये शिरकाव केला.
फ्रेंच जाहिरात एजन्सीसाठी तिने दीर्घकाळ काम केले. त्यानंतर 2003 मध्ये एनआरआय आदित्य धिल्लनबरोबर तिचा विवाह झाला”पापा कहते है’ विशेष चालला नाही. मात्र त्यानंतर मयूरीला “बेतबी’, “होगी प्याऱ् की जीत्’ णि बदल सरख्या सिनेमांमध्येही तिला संधी मिळाली. त्यानंतर मात्र तिने आपल्या अभिनय करिअरला पूर्णविराम दिला. सध्या ती गुगलमधील अप्ल्य् कॉर्पोरेट प्रोफाईल आणि फॅमिलीमध्ये एकदम खूष आहे. तिच्यासाठी छोटेसे फिल्मी करिअर म्हणजे ग्लॅमर मिळवण्याचा छोटासा टाईमपास प्रयत्न होता.