मुंबई: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा 37 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये 100 सामने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे.
2008मध्ये आयपीएलला सुरुवात झाली. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 175 सामने खेळले आहेत. यापैकी 100 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
तर, 75 सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जिंकलेल्या 100 पैकी 1 सामना मुंबईने सुपरओव्हरमध्ये जिंकला आहे. आतापर्यंत मुंबईने तिनदा आयपीएलचे विजेतेपदही पटकावले आहे.