लडाख : देशाचे माजी पंतप्रधान कॉंग्रेस नेते राजीव गांधी यांची आज जयंती आहे. यानिमित्त राहुल गांधी यांनी लडाखमधील 14270 फूट उंचीवर असलेल्या पंगत्सो तलावाच्या काठावर त्यांचे वडील आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच ट्वीट करत त्यांनी वडिलांच्या आठवणीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राहुल गांधींनी ट्वीट करत लिहिले की, “पप्पा, तुमच्या डोळ्यांत भारतासाठी जी स्वप्नं होती, ती या अनमोल आठवणींमधून दिसतायत. तुमची स्वप्न हाच माझा मार्ग आहे – प्रत्येक भारतीयाचा संघर्ष आणि स्वप्न समजून घेतोय, भारत मातेचा आवाज ऐकत आहे.” याशिवाय काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रियांका गांधी यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर जावून त्यांना आदरांजली अर्पण केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहे, या दौऱ्यादरम्यान ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी राहुल गांधींची यांनी लेह शहरापासून पैंगोंग तलावापर्यंत बाईक चालवली. आणि सुंदर दृश्यांचा आनंद घेतला. सध्या त्यांच्या या बाइक राईडचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर आणि राज्याची केंद्रशासित प्रदेशात पुनर्रचना झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच लडाख दौरा आहे.
पापा, आपकी आंखों में भारत के लिए जो सपने थे, इन अनमोल यादों से छलकते हैं।
आपके निशान मेरा रास्ता हैं – हर हिंदुस्तानी के संघर्षों और सपनों को समझ रहा हूं, भारत मां की आवाज़ सुन रहा हूं। pic.twitter.com/VqkbxoPP7l
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 20, 2023
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. येथे कोणी घुसखोरी केली नाही, हा पंतप्रधानांचा दावा खरा नाही. लडाखच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. लडाखला दिल्या गेलेल्या दर्जामुळे येथील लोक खूश नाहीत. राज्य नोकरशाहीनं चालवू नये, ते जनतेच्या आवाजानं चालवलं पाहिजे, असं लोक म्हणत असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत.