मुंबई – बॉलिवूडचा ‘डॉन’ पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कब्जा करण्यासाठी परत येतोय. मात्र यावेळी अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान नाही तर रणवीर सिंग डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. फरहान अख्तरने जेव्हा रणवीर सिंगबद्दल ही घोषणा केली तेव्हा लोकांकडून अनेक प्रतिक्रिया आल्या. या चित्रपटात रणवीरसोबत कियारा अडवाणी दिसणार असल्याचे सांगण्यात आले. पण चित्रपटाच्या कलाकारांमध्ये मोठा बदल झाल्याची बातमी समोर आली आहे.
कियारा अडवाणीला ‘डॉन 3’मधून वगळण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर समोर येत आहे. या चित्रपटात ‘आदिपुरुष’ची सीता म्हणजेच क्रिती सेनॉनने कियाराची जागा घेतली आहे. त्यानुसार, रणवीर सिंग आणि क्रिती सेनन यांचाही हा पहिलाच चित्रपट असेल. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, अद्याप फरहान अख्तरकडून याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
‘डॉन’ ज्यामध्ये अमिताभ बच्चन पहिल्यांदा 1978 मध्ये दिसले होते. त्यानंतर 2006 आणि 2011 मध्ये शाहरुख खान स्टारर ‘डॉन’ आणि ‘डॉन 2’ हे दोन सिनेमे सुपरहिट झाले. पण आता चित्रपट निर्माता आणि अभिनेता फरहान अख्तरने त्याच्या आगामी ‘डॉन 3’ चित्रपटाच्या घोषणेने लोकांची उत्कंठा वाढवली आहे. अलिकडच्या काळात ही खरोखरच सर्वात मोठी घोषणा आहे. प्रेक्षक या थ्रिलरची आतुरतेने वाट पाहत आहेत जे अॅक्शन चित्रपटांना पुन्हा परिभाषित करेल आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडेल.