गुन्हा दाखल झाल्यानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

बीड – सावरगाव घाट येथील भगवानभक्ती गड येथे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजामुंडें यांनी ऑनलाइन दसरा मेळाव्याचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमा दरम्यान सोशल डिस्टंन्सिंगचं पालन न केल्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 जणांविरूद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबाच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पाहिली… कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..’, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

पंकजा मुंडेसह पाथर्डीच्या आमदार मोनिका राजुरे, जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरूड, राजेंद्र सानप, संदेश सानप, राजाभाऊ मुंडे यांसह अन्य 40 ते 50 जणांचा गुन्हा दाखल झालेल्यामध्ये समावेश आहे. यांच्याविरूद्ध कलम 188, 269, 270 सह कलम 51 (ब) आपत्ती व्यवस्थान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.