Pankaja munde On Loksabha election : भाजपची लोकसभेची पुढची यादी लवकरच जाहीर होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जागांबाबत असलेला सस्पेन्स संपणार आहे. महाराष्ट्रात बारामती,पुणे अशा जागांवर भाजप कोणाला उमेदवारी देणार यासह बीडमध्ये पुन्हा प्रीतम मुंडे कि पंकजा मुंडे यांना लोकसभेत उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अशात पंकजा मुंडे यांनी एक मोठं विधान केलं आहे.
गेल्या विधानसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर वारंवार त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यांच पुनर्वसन झालं नाही. अशात आता पंकजा मुंडे यांनी थेट जनतेला आवाहन केलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन.. असं पंकजा म्हणाल्या आहेत. | Pankaja munde On Loksabha election 2024
जेव्हा माझ्यावर रेड पडली तेव्हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी 11 कोटी रुपये जमा केले. हे माझ लोकांशी असलेलं नातं आहे. मला ‘माजी’ कोणी केलं हे आता सांगता येणार नाही कारण सगळेच सोबत आहेत सध्या सरकार तीन इंजिनने जोडलेलं आहे असा उल्लेख देखील यावेळी त्यांनी केला. | Pankaja munde On Loksabha election 2024
पंकजा म्हणाल्या,मी सध्या ‘माजी’ असून तुम्हाला काय देऊ ? असा प्रश्न मला पडतो. मंचावर बसलेले सुरेश धस, बाळासाहेब आजबे, प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी, असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन असं आवाहन पंकजा यांनी यावेळी केले.
बीड जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर देवस्थान संस्थांच्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. खासदार प्रीतम मुंडे देखील यावेळी उपस्थित होत्या. | Pankaja munde On Loksabha election 2024