पंड्या लवकरच पुनरागमन करणार

नवी दिल्ली : दुखापतीने अनेक महिने संघाबाहेर असलेला भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या तंदुरुस्त होत असल्याचे स्पष्ट झाले असून आता तो लवकरच संघात पुनरागमन करेल. दुखापतीमुळे जवळपास 6 महिने पंड्या संघाबाहेर होता. पंड्याच्या कंबरेला दुखापत झाली होती. त्याच्यावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.

मात्र त्यानंतर पंड्याला पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी बराच कालावधी लागला. राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी पंड्या स्थानिक क्रिकेट खेळणार आहे. त्याचबरोबर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) देखील तो सहभागी हेईल. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी -20 मालिकेतील सामन्यात पंड्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी -20 विश्‍वकरंडक स्पर्धेला समोर ठेवत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पंड्याला शस्त्रक्रियेसाठी लंडनला पाठविले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.