मुंबई – तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सध्या महाराष्ट्रात बीआरएस पक्ष वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. या अनुषंगाने राव हे आपल्या निवडक सहकाऱ्यासह पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन देखील घेणार आहेत. सध्या वारी सुरु आहे. अशात के चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात ऍक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. नुकतंच त्यांचं महाराष्ट्रात आगमन झालं असून, त्यांनी उस्माबादच्या उमरग्यामध्ये दुपारच भोजन घेतलं.
त्यानंतर के चंद्रशेखर राव पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. उद्या ते पंढरीत विठूरायाच दर्शन घेतील. दरम्यान, चंद्रशेखर राव यांनी पंढरपुरात येताना मटणावर ताव मारल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ शकते.
चंद्रशेखर राव यांनी आधी उस्मानाबादच्या उमरग्यामध्ये आले. तिथे त्यांन कार्यकर्त्यांसह दुपारच भोजन घेतलं. यावेळी त्यांनी मांसाहार केल्याचं दिसून आलं आणि त्यामुळेच आता त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे.
सध्या पंढपुरात अतिशय भक्तिमय वातावरण पाहायला मिळतात आहे. वारीला जाताना मांसाहार टाळला जातो. मात्र, पंढरपुरात दाखल होण्यापूर्वीच चंद्रशेखर राव यांनी मटणावर ताव मारल्याने राजकीय वर्तुळातून नाराजीचे सूर उमटताना दिसून येत आहेत.
अमोल मिटकरी यांचं ट्विट चर्चेत..!
मटनाचा शाही बेत! पंढरी वारिवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का ? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका ? पंढरपूर येताना 10 हजार वेळा विचार करा.
पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका.@TelanganaCMO pic.twitter.com/9eKupfbNZk— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 26, 2023
“मटनाचा शाही बेत ! पंढरी वारिवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका? पंढरपूर येताना 10 हजार वेळा विचार करा… पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका.’ या आश्याचे ट्विट त्यांनी केलं आहे.