पुणे – बहिण भावाचं नातं घट्ट करणारा सण रक्षाबंधन. या सणानिमित्त आज पंढरपुरच्या विठ्ठलाच्या हाती सोन्याची राखी बांधून हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यातील विठ्ठलभक्त ज्ञानेश्वर घोलप यांनी विठुरायासाठी खास नक्षीकाम केलेली दोन तोळे वजनाची सोन्याची राखी विठ्ठल चरणी अर्पण केली आहे.
बहिण आपल्या भावाच्या हाती राखी बांधून रक्षणाचे मागणे घालते. असेच साकडे आज अऩेक भाविक भक्तांनी विठुरायाकडे घातले आहे. विठ्ठल भक्त ज्ञानेश्वर घोलप यांनी पुणे येथील सराफाकडून 1 लाख 10 हजार रुपयांची सोन्य़ापासून बनवलेली सुबक व नक्षीकाम केलेली राखी खास विठुरायासाठी तयार केली आहे. आज मंदिरातील पुजाऱ्यांच्या हस्ते सोन्याची राखी विठुरायाच्या हाती बांधण्यात आली.