परिंचे/नीरा – सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योति … भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया. आयुष्याच्या शंभरी नंतर ही हा गोडवा कायम असल्याचे आज पुरंदर तालुक्यातील सटलवाडी येथे पाहायला मिळाले. येथील 104 वर्षांच्या बहिणीने आपल्या धाकट्या भावाला राखी बांधून 101वा रक्षाबंधन सण साजरा केला.
गजानन व अनुसया या वृद्ध भाऊ बहिणीने 101 वा रक्षाबंधन सोहळा साजरा केला.सटलवाडी (ता.पुरंदर) येथील गजानन कदम (वय 102) व दौंड तालुक्यातील अनुसया (वय 104) या वृद्ध भाऊ बहिणीने 101 वा रक्षाबंधन सोहळा नातू, पंतू, खापरपंतू तसेच कुटुंबीय उपस्थित साजरा केला.अनुसरा व गजानन या शतकवीर भाऊ बहिणीचे प्रेम समाजाला दिशा दर्शक असून हे अतूट नाते आधुनिक युगात खूप गोष्टी शिकवून जात आहे.
अनुसया यांच्या पाठीवर जन्मलेल्या गजानन यांच्या जन्मानंतर तीन वर्षांच्या असलेल्या अनुसया अगदी पहिल्या वर्षापासून गजानन यांच्या चिमुकला हातावर राखी बांधायला सुरुवात केली पुढे अनुसयाबाईंचा विवाह झाल्यानंतर कधीही न चुकता रक्षाबंधनाच्या दिवशी हे भाऊ बहिण एकत्र येतात. पूर्वी वाहतुकीची सोय नसल्याने गजानन हे सायकलवरून बहिणीकडे जाऊन रक्षाबंधन साजरा करायचे. एखाद्या वर्षी गजानन यांना वेळ नसल्यास अनुसयाबाई सटलवाडीला चालत येऊन राखी बांधायच्या.
अनुसया बाईंना नऊ मुली, दोन मुले, 36 नातवंडे, 45 परतुंडे, 19 खापरतोंड असून गजानन यांना 6 मुली 2 मुले 22 नातवंडे, 28 परतुंडे एकत्र कुटुंब पद्धती आहे. दोन्ही कुटुंबे सांप्रदायिक असून माळकरी आहेत. अनुसया बाईंचे कुटुंब तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पायी वारी करतात गजानन यांचे कुटुंब सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्यात पायी वारी करत असल्याचे गजानन यांचे चिरंजीव गोपाळ कदम यांनी सांगितले. सटलवाडी (ता. पुरंदर) : येथे अनुसया बाई व गजानन यांनी 101 रक्षाबंधन सोहळा साजरा केला.