Pandhari Sheth Phadke । गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके यांचं आज निधन झालं आहे. पंढरीशेठ यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
बैलगाडा शर्यतींचा विषय निघाल्यानंतर पहिलं नाव येते ते म्हणजे विहिघर येथील प्रसिद्ध ‘पंढरीनाथ फडके’. 1986 पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. आत्तापर्यंत 40 ते 50 शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती. ( Pandhari Sheth Phadke )
बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा ‘बैल’मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती.
पंढरीशेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथील परिसरात शोकाकूल वातावरण आहे. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. मुळचे पनवेलचे असणारे पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यतीचे शौकिन म्हणून ओळखले जातात. ( Pandhari Sheth Phadke )