पाचगणी – महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाले असून आरक्षणामुळे तालुक्यात पुन्हा महिलाराज येण्याची नांदी झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गट व तळदेव गटाला दोन्ही सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने मातब्बरांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कै. बाळासाहेब भिलारे यांच्या विचारांचा वारसा जपताना भिलार गटातून त्यांच्या कुटुंबातील तेजस्विनी भिलारे यांच्या उमेदवारीबाबत भिलार गटातून उत्सुकता वाढली असताना माजी सभापती रुपाली राजपुरे यांच्या नाव देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातू पुढे येऊ लागले
आहे. महाबळेश्वर तालुक्यात शिंदे सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षही जोर लावणार असल्याचे चित्र पाहयला मिळणार आहे. भिलार गटातून भाजपकडून वैशाली भिलारे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तळदेव गटात एकनाथ शिंदे गट की शिवसेना असा संघर्ष पाहयला मिळत असून आमदार गटाकडून संजय गायकवाड यांचा हुकमी पत्ता निर्णायक ठरणार आहे.
महाबळेश्वर तालुक्यात पंचायत समितीच्या आरक्षण सोडत पुडीलप्रमाणे आहे. भिलार नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मेटगुताड सर्वसाधारण महिला, तळदेव सर्वसाधारण, कुंभरोशी सर्वसाधारण भिलार गणात मागास प्रवर्गातील महिलेसाठी मातब्बरांना दमछाक करावी लागणार आहे.