Sonali Kulkarni Viral Video| अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोनाली तिचे नवनवीन प्रोजेक्ट, फोटोशूट, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच तिने पारंपारिक लुकमधील तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
व्हिडिओमध्ये सोनाली कुलकर्णीच्या नथीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटो आणि व्हिडीओमध्ये ती खूप सुंदर दिसते. पण नाकामध्ये घातलेल्या नथीने सोनालीची पंचायत झाल्याचे दिसते. सोनाली कुलकर्णीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर निळ्या रंगाच्या साडीमधील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. Sonali Kulkarni Viral Video|
सोनाली या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. सोनाली कुलकर्णीने लाल रंगाची काठ असेलली निळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर गळ्यामध्ये सोन्याचे दागिने, कानात झुमके आणि नाकामध्ये सुंदर नथ घातली आहे. Sonali Kulkarni Viral Video|
View this post on Instagram
परंतु नाकामध्ये मोठी नथ घातल्यामुळे सोनाली कुलकर्णीला जेवण करता येत नव्हते. त्यामुळे खाताना तिला नथ बाजूला करून जेवण करावे लागत होते. मात्र असे असताना देखील ती आनंदाने हे सर्व करत होती. सोनालीच्या या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोनाली कुलकर्णीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी ‘नाकापेक्षा नथ मोठी’, ‘नाकापेक्षा मोती जड म्हण प्रत्यक्षात…’, ‘नाकापेक्षा मोती जड’, नाकापेक्षा नथ जड’ अशाप्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, मराठीसह सोनालीने मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘मलाइकोट्टई वलीबन’ चित्रपटात ती झळकली. हा चित्रपट हिंदी, कन्नड, तमीळ व तेलुगू या भाषांमध्येही डब करण्यात आला आहे. याशिवाय तिने ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘क्लासमेट्स’, ‘पोश्टर गर्ल’, ‘हिरकणी’ या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
हेही वाचा:
“एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा” ; पक्षात येण्याअगोदरच खडसेंवर ‘या’ भाजप नेत्याची सडकून टीका