रोम – फ्रान्सची नवोदित टोनिसपटू फियोना फेरो हिने करोनाच्या धोक्यानंतर सुरू झालेली युरोपमधील मानाची पालेर्मो टेनिस स्पर्धा जिंकली. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तिने इस्टोनियाच्या चौथ्या मानांकित ऍनेट कोंतावेटवर 6-2, 7-6 अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली.
जागतिक क्रमवारीत फियोना 53 व्या स्थानावर आहे. मात्र, तिने चौथ्या मानांकित खेळाडूला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्चपासून करोनाचा धोका जगभरात पसरल्यानंतर सर्वच स्पर्धा ठप्प झाल्या होत्या. त्यानंतर याच आठवड्यात ही स्पर्धा सुरू झाली.
कोंतावेटला गेल्या वर्षीपासून एकूण सहा स्पर्धांच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मात्र, तिने केवळ एकदाच विजेतेपद प्राप्त केले आहे. या स्पर्धेतही तिच्या अपयशाची मालिका कायम राहिली आहे. महिला व पुरुष गटात सुरू झालेली मार्चनंतरची ही पहिलीच स्पर्धा ठरली.