टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि “बिग बॉस 4’ची विजेती श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती सतत नवीन फोटोशूट्स करून चर्चेत असते. पलक तिवारी यांनी पुन्हा एकदा आपले लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. यात पलक तिवारी अत्यंत हॉट स्टाईलमध्ये दिसत आहे. यावर चाहत्यांनी अनेक कॉमेंटस् करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
पलकचे फोटो श्वेता तिवारीनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंना काही तासांतच हजारो व्यूज मिळाली. पलक तिवारी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. तिचे 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर आहेत. तिचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल होतात.
अलीकडेच तिचा एक व्हिडीओ आणखी व्हायरल झाला होता. ज्यामध्ये पलक आपल्या तीन वर्षाच्या भावासोबत व्यायाम करताना दिसते. दरम्यान, पलक ही श्वेता तिवारीचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. यानंतर श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केले. रेयांश हा श्वेता आणि अभिनव यांचा मुलगा आहे. पलकच्या सिनेसृष्टीतील पर्दापणाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येतात. पण अद्याप त्याची पुष्टी मिळालेली नाही.