“पाकिस्तानी नागरिकाने मोदी जय म्हटले तरी त्याला पद्मश्री मिळेल”

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांची सरकारवर खोचक टीका

मुंबई : पाकिस्तानी वंशाचा गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्यावरुन विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. मनसे, कॉंग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुध्दा अदनान सामीला पुरस्कार देण्यास विरोध केला आहे. पाकिस्तानमधून येऊन कोणी जय मोदीचा नारा देत असेल तर त्याला भारताचे नागरिकत्व दिले जाते त्याचसोबत त्याला पद्मश्री पुरस्कार सुध्दा दिला जातो, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.


नवाब मलिक यांनी सांगितले की, ‘अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्यावरुन मोदी सरकारची निती स्पष्ट दिसून येत आहे. मोदींना तसेच भाजपला वाटले तर पाकिस्तानींना भारतीय नागरिकत्व मिळेल आणि पद्मश्री पुस्काराने सुध्दा गौरवण्यात येईल. हा देशातील जनतेचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. मात्र, जे भारतीय आहेत त्यांना भारतीय असल्याचा पुरावा मागितला जाईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here