पाककडून भारतीय हद्दीत पुन्हा ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न

सुरक्षा यंत्रणांकडून सीमेवर दक्षतेचा इशारा

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सुरू असणाऱ्या कारवाया काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. घुसखोरीचा प्रयत्न झाल्यानंतर आता पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतीय हद्दीत ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पंजाबमधील फिरोजपूरमधील हुसैनवाला सीमेवर सोमवारी रात्री बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानच्या बाजूने पाच वेळा ड्रोन उडताना पाहिले.

दरम्यान, याप्रकारानंतर सीमेवर दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच बीएसएफलादेखील अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीएसएफने पंजाब पोलीसांना याबाबत माहिती दिली आहे. तसंच स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

भारतीय सीमेवर सोमवारी रात्री पाकिस्तानी ड्रोन पाच वेळा उडताना दिसले. तसेच माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार एकदा एका ड्रोनने भारतीय हद्दीतही प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. यानंतर बीएसएफच्या जवानांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर आता पंजाब पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी याचा तपास सुरू केला आहे.

बालाकोटमध्ये भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांचे तळ उद्‌वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांना हत्यारं पुरवण्यासाठी छोट्या ड्रोनचा वापर केला होता. यापूर्वी भारतीय हद्दीत जीपीएसच्या माध्यमातून चालणारे अनेक ड्रोन शिरले होते. त्यांच्या सहाय्याने 10 किलोंपर्यंत सामान वाहून नेता येत असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)