इस्लामाद – तेहरिक ए तालिबान पाकिस्तानने पाकिस्तानातील पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ गट आणि बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी या सत्तारुढ आघाडीच्या प्रमुख पक्षातील वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.
दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला पाठिंबा देणे यापुढच्या काळातही सुरू ठेवले, तर या पक्षाच्या नेत्यांची हत्या करण्याची धमकी “टीटीपी’ने दिली आहे. एक निवेदन प्रसिद्धीस देऊन “टीटीपी’ने ही धमकी दिली आहे. लोकांनी या पक्षाच्या नेत्यांच्या फार जवळ जाऊ नये, असेही “टीटीपी’ने म्हटले आहे.
“जिहाद’ खऱ्या अर्थाने केवळ “टीटीपी’ करत असून देशातील सुरक्षा यंत्रणा याच आपले लक्ष्य असल्याचे ‘टीटीपी”ने म्हटले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या मातोश्री माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांचीही दहशतवाद्यांनी 2007 साली हत्या केली होती. बिलावल अजून लहान आहेत. त्यांनी युद्ध बघितलेले नाही. मात्र त्यांनीच “टीटीपी’विरोधात युद्ध पुकारले आहे.
सुप्रीम कोर्टाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत मोठा निर्णय; “लोकप्रतिनिधींवर अतिरिक्त बंधने…”
आपल्या गटाने दीर्घकाळापासून राजकीय नेत्यांविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र बिलावल यांनीच आपल्या आईच्या प्रेमाची जागा अमेरिकेला देऊ केली आहे. पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी आपल्या पक्षाच्यावतीने “टीटीपी’विरोधात युद्ध पुकारले असल्याचेही या धमकीच्या निवेदनात म्हटले आहे.