मुझफ्फराबाद/ इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मिरमध्ये मंगळवारी झालेल्या भूकंपात किमान 25 जणांचा मृत्यू झाला. तर 400हून अधिक जण जखमी झाले. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबच्या सीमेवर हा भूकंप झाला. मृतांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या एका जवानाचा समावेश आहे.
शेकडो घरे जमीनदोस्त, वाहनांचे नुकसान
मोबाईल, वीज सेवा खंडित,
लष्कराकडून मदतकार्य सुरू
मंगला धरण सुरक्षित
पाकिस्तानच्या राच्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन फ्राधिकरणाचे चेअरमन लेफ्ट. जन महंमद अफजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मदतकार्य वेगाने सुरू असून परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. मिरपूरमध्ये 12 जणांचा रुग्णालयात नेताना अथवा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर जतलान आणि खारी शरीफ भागातील ग्रामीण भागात 13 जणांचा मृत्यू झाला. लष्कराच्या रुग्णालयात 150 जणांवर उपचार सुरू आहेत. काही अत्यवस्थ रुग्णांना मंगला आणि रावळपिंडी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील लोकांची मोबाईल सेवा खंडित केली असल्याने त्यांना आपल्या प्रियजनांची माहिती मिळू शकत नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणिबाणी लागू करण्यात आली आहे.