नवी दिल्ली : पाकिस्तानातल्या कर्तापुर साहिब गुरूद्वारातील एक घुमट कोसळण्याची घटना घडली आहे याची कारणे शोधण्याची सुचना भारताने पाकिस्तानला केली आहे. या घटनेमुळे शिख भाविकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले आहे त्यांच्या भावनेला धक्का पोहचला असून ही घटना नेमकी कशामुळे झाली याची चौकशी करावी अशी सुचना भारताने पाकिस्तानला केली आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यापासूनच हा गुरूद्वारा दोन देशांतील कॉरिडॉर मार्फत भारतीय भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला होता. कर्तापुर साहिब हा गुरूद्वारा पाकिस्तान्या नरोवाल जिल्ह्यात आहे. तो भारतातील डेराबाबा नानक गुरूद्वारापासून केवळ चार किमी अंतरावर आहे.