जकार्ता – असे म्हणतात कि ‘उपर वाला जब भी देता है देता है तो छप्पर फाडके देता है’ ही म्हण इंडोनेशियातील एका तरुणासाठी खरोखरच प्रत्यक्षात आली आणि आकाशातून पडलेल्या एका उलकेमुळे तो करोडपती झाला.
इंडोनेशिया मध्ये शवपेटी बनवण्याचे काम करणारा 33 वर्षे जोषुवा होत्संग त्याच्या बाबतीत ही घटना घडली आहे. अतिशय किरकोळ उत्पन्न असणारा जोषुवा बघता बघता दहा कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक बनला जोशुआ यांच्या घरावर आकाशातून एक उल्का पडली त्याच्या घराचे छप्पर भेदून ही उल्का त्याच्या घरांमध्ये आली.
ही उल्का तब्बल चारशे कोटी वर्षापूर्वींची दुर्मिळ उल्का असल्याचे लक्षात आल्यानंतर जोशुआ यांचे नशीब पालटायला सुरुवात झाली. दोन किलो 100 ग्रॅम वजनाची ही उल्का असून या उलकेच्या बदल्यात त्याला तब्बल 14 लाख पाऊंड म्हणजेच दहा कोटी रुपये मिळाले. आकाशातून ही उल्का जमिनीवर पडली तेव्हा जोशुआ च्या घरात या उलकेने तब्बल पंधरा सेंटीमीटर खोल खड्डा केला होता.
जोशुआ ने जमिनीतून ही उल्का बाहेर काढली तेव्हा ती खूप गरम होती. आणि काही प्रमाणात तुटली होती. त्याच्या घराच्या छतावर ही उल्का कोसळत असताना मोठा आवाज झाला होता. त्यामुळे आसपासचे लोकही जमा झाले होते.
ही आकाशातून पडलेले उल्का असल्याचे लक्षात येताच जोशाने संबंधित लोकांना त्याची कल्पना दिली तज्ञांना या उलकेच्या दुर्मिळतेची कल्पना आल्याने त्यानी उल्का ताब्यात घेऊन त्याबदल्यात जोशुआला दहा कोटी रुपये दिले त्याने 31 वर्षे नोकरी केली असती तरी त्याला दहा कोटी रुपये मिळाले नसते पण एका उलकेने त्याला क्षणार्धात करोडपती केले आहे .
जोशुआला तीन मुली असून या पैशाच्या माध्यमातून आपल्या गावात एक चर्च उभारणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. घरावर उल्का पडली हा अतिशय चांगलाशुभसंकेत असल्याचेही त्याने म्हंटले आहे.