हंबानटोटा :- पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो 100 एकदिवसीय सामन्यातील 99 डावानंतर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान बाबरने ही कामगिरी केली. आझमने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाला मागे टाकले. तसेच भारताचा विराट कोहली या यादीत नवव्या क्रमांकावर आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाबर आझमने 6 चौकारांसह 53 धावा केल्या. बाबरचा हा 100 वा एकदिवसीय सामना आहे आणि त्यात 99 डावांत त्याने 5000 पेक्षा अधिक धावा करत तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.
त्याने आतापर्यंत 99 डावांमध्ये 18 शतके फटकावली आहेत. तटस्थ ठिकाणी 100 एकदिवसीय सामने खेळणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला आहे.