कराची – पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला. त्याने या सामन्याच्या अखेरच्या दिवशी 196 धावांची खेळी केली. त्याचे द्विशतक अवघ्या 4 धावांनी हुकले. मात्र, कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात 196 धावांची खेळी करत त्याने 145 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासीतील पहिलाच फलंदाज बनण्याचा मान मिळवला.
हा सामना अनिर्णित राहिला असला तरीही बाबरच्या खेळीमुळे चांगलाच गाजला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 556 धावा केल्या. पाकिस्तानचा पहिला डाव 148 धावांत संपला. त्यानंतरही ऑस्ट्रेलियानेच फलंदाजी करत दुसरा डाव 2 बाद 97 धावांवर घोषित केला. त्यानंतर पाकिस्तानने पाचव्या दिवसअखेर आपल्या दुसऱ्या डावात 7 गडी गमावुन 443 धावा करत सामना
अनिर्णित राखला.