पाच बॅट कमांडोंना कंठस्नान घातल्याचे चित्रिकरण
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीम (बॅट)च्या गुसखोरी करण्याच्या अयशस्वी प्रयत्नाचा व्हिडिओ लष्कराने प्रसारित केला. त्यात बॅटचे मृत कमांडो सामुग्रीसह दिसत आहेत.
#WATCH: Indian Army foiled an infiltration attempt by a Pakistani BAT(Border Action Team) squad along the Line of Control in Keran Sector of Kupwara in the 1st week of Aug. Bodies of eliminated Pakistani Army regulars/terrorists along with equipment seen in video.#JammuAndKashmir pic.twitter.com/kXKsJskVs0
— ANI (@ANI) September 9, 2019
बॅटने घुसखोरीचा हा प्रयत्न 31 जुलै ते 1 ऑगस्टच्या दरम्यान केला. यात कंठस्नान घातलेल्या चार बॅट कमांडोजचे मृतदेह नियंत्रण रेषेच्या आत भारतीय हद्दीत दिसत आहेत.
ते मृतदेह घेण्यासाठी पांढरे निषाण घेऊन पाक लष्कराने यावे. अंत्यसंस्कारासाठी ते त्यांच्या ताब्यात देऊ, अशी भूमिका भारतीय लष्कराने घेतली. मात्र पाकने त्याला प्रतिसाद दिला नाही. ऑगस्ट महिन्यात बॅटकडून घुसखोरी करण्याचे पाच प्रकार घडले. ते हाणून पाडण्यात आले, असे लष्कराने सांगितले.