इस्लामाबाद – आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानने चीनकडे एक वर्षासाठी २ अब्ज डॉलरच्या कर्जाची मागणी केली आहे. पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांना याबाबतचे पत्रही पाठवले आहे.
चीनकडून पाकिस्तानला कर्ज देण्याचा कालावधी २३ मार्च रोजी पूर्ण झाला असल्यामुळे चीनने लवकरात लवकर कर्जाची रक्कम पाकिस्तानला द्यावी, असे काकर यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. पाकिस्तानच्या आर्थिक अडचणीच्या काळात चीनने दिलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल काकर यांनी चीनला धन्यवाद देखील दिले आहेत.
या महिन्याच्या प्रारंभी संयुक्त अरब अमिरातीनेही पाकिस्तानला २ अब्ज डॉलरचे कर्ज दिले आहे. युएई व्यतिरिक्त सौदी अरेबियाने स्टेट बँक ऑफ पाकिस्तानला ५ अब्ज डॉलर जमा केले आहेत.याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडूनही १.२ अब्ज डॉलरच्या दुसर् या हप्त्याची मागणीही पाकिस्तानने केली आहे.
मात्र पाकिस्तानला कर्जाचा दुसरा हप्ता देण्याबरोबर नवीन कर्ज देण्याविषयी नाणेनिधी राजी नाही. मात्र जर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे सरकार सत्तेत असते, तर हे कर्ज यापूर्वीच मिळवले गेले असते,
असेपाकिस्तानचे माजी अर्थमंत्री इशाक दर यांनी म्हटले आहे. नाणेनिधीने पाकिस्तानला नवीन कर्ज मंजूर करण्यापूर्वी काटकसरीच्या प्रभावीउपाय योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.