अमृतसर : बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या ड्रोनच्या कारवायांत वाढ झाली आहे. लष्कर तैनात असणाऱ्या ठिकाणी ड्रोनची येजा झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.
पठाणकोट ते फजिल्का जिल्ह्याच्या सीमेवर ड्रोनच्या व्यापक हालचाली होत असल्याचे दिसत आहे. मुख्यत: रात्रीच्या वेळी या हालाचाली होतात. जवानांनी ड्रोनचे आवाज ऐकले आहेत. काहीवेळेस त्यांच्यावर प्रकाशझॅतही टाकण्यात आले. मात्र रात्री जवानांकडे लहान शस्त्रे असल्याने ती पाडता आली नाहीत असे वृत्त इंडियन एक्सप्रेसच्या संकेत स्थळाने लष्करी सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. काही भागात जिथे एअर डिफेन्स गन उपलब्ध आहेत, तेथे हे ड्रॅन पाडण्याचे प्रयत्न झाले. मात्र रडारवर ही मशीन येण्यात अडथळे येत आहेत.