नवी दिल्ली – देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज (दि. ८) ११९ मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Actor Kangana Ranaut receives the Padma Shri Award 2020. pic.twitter.com/rIQ60ZNd9i
— ANI (@ANI) November 8, 2021
दरम्यान, यावेळी ७ मान्यवरांना पद्म विभूषण, १० जणांना पद्म भूषण आणि १०२ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. तर १६ मान्यवरांना मरणोपरांत पद्म पुरस्कार देण्यात आला आहे.
Singer Adnan Sami receives the Padma Shri Award 2020. pic.twitter.com/SfL988lugY
— ANI (@ANI) November 8, 2021
तसेच प्रसिद्ध गायक अदनान सामी, अभिनेत्री कंगना राणावत यांना पद्मश्री तर मेरी कोम यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे सर्व पुरस्कार देण्यात आले.
Noted Hindustani classical singer Pandit Chhannulal Mishra receives the Padma Vibhushan award 2020. pic.twitter.com/IEsJ2AtGt3
— ANI (@ANI) November 8, 2021
Delhi: Olympian badminton player PV Sindhu awarded the Padma Bhushan pic.twitter.com/TqUldnQgr3
— ANI (@ANI) November 8, 2021