नवी दिल्ली – मी दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करतो, ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह नागरिकांना जीव गमावावा लागला. परदेशी पाहुणे भारतात आलेले असताना अशा प्रकारचा हिंसाचार उफळणे ही देशासाठी लाजिरवाणी बाब आहे. असं म्हणत एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Asaduddin Owaisi, AIMIM in Hyderabad: I condemn the violence that took place in Delhi today, in which a Police constable and civilians lost their lives. This is a shame for the country that violence broke out when foreign dignitaries are on a visit here. pic.twitter.com/dKhquSJQvv
— ANI (@ANI) February 24, 2020
दरम्यान, दिल्लीत आज पुन्हा लागोपाठ दुसऱ्या दिवशी सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार चकमक झाली. या हिंसाचारात आतापर्यंत हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्यासह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ओवेसींनी देशासाठी ही लाजिरवाणी बाब असल्याचं ते म्हणाले आहेत.