नवी दिल्ली :अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांचा आज भारतातील दुसरा दिवस आहे. ते आज हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा करतील. या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत दुपारचे जेवण करतील.
Delhi: PM Narendra Modi receives US President Donald Trump and the First Lady Melania Trump, at Hyderabad House. pic.twitter.com/aXFfNT0KwD
— ANI (@ANI) February 25, 2020
दुपारी ट्रम्प अमेरिकन दूतावासाच्या खासगी कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत तर मेलानिया ट्रम्प आज दिल्लीतील एका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तसेच त्या ‘हॅपीनेस अभ्यासक्रम’ अंतर्गत विविध उपक्रमाची पाहणी करतील. सायंकाळी ट्रम्प राष्ट्रपतीभवनात राम नाथ कोविंद यांची भेट घेतील.
दरम्यान त्यांनी आज सकाळी त्यांचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर ट्रम्प यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना श्रद्धांजली वाहिली.