नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रगीत हे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कुठेही राष्ट्रगीत लागले तर त्याचा मान म्हणून प्रत्येक भारतीय स्तंभापाने उभे राहतो. मात्र सध्या सोषसील मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन मुली राष्ट्रगीत सुरु असताना धूम्रपान करताना दिसून येत आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये दोन मुली सिगारेट ओढत असताना भारताच्या राष्ट्रगीताचा अपमान करताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील मुली या कोलकत्ता येथील असून त्या हसत, खिंदळत जन गन मन… असं म्हणत राष्ट्रगीताचा अपमान करत आहेत.
View this post on Instagram
राष्ट्रगीत म्हणत असताना त्या सिगारेटही दाखवत आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रगीताचा चुकीचा उल्लेखही या तरूणींकडून केला जात असल्यामुळे अनेकांनी या दोन मुलींना अटक करण्याची मागणी केली आहे. तर हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.