मुंबई – सध्या सलमान खान आपला आगामी चित्रपट किसी का भाई किसी की जानमुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित होताच अनेकांनी सोशल मीडियावर सलमानला त्याच्या ऍब्जवरून ट्रोल करायला सुरुवात केली. अनेकांनी सलमानचे अब्ज व्हीएफएक्सची कमाल असल्याचे म्हंटले आहे. आता या सर्व ट्रोलिंगला सलमानने जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.
आपल्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर सोहळ्यात सलमानने थेट मीडियाशी संवाद साधला आणि विविध प्रश्नांची उत्तरे दिली.यावेळी सलमानसोबत अभिनेत्री पुजा हेगडे देखील उपस्थित होती. यावेळी सलमानच्या ऍब्जचा विषय देखील निघाला तेव्हा सलमानने थेट आपल्या शर्टचे बटन काढले. याचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
यावेळी सलमान म्हणाला, प्रत्येकाला वाटतं की चित्रपटातील व्हीएफएक्स अप्रतिम आहे. पण हे खरे आहेत म्हणत सलमानने शर्टचे बटन उघडले. आता चार आहेत आणि नंतर चारचे सहा होतील. सलमानचं हे वाक्य ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सलमानला शर्ट उघडताना पाहून अभिनेत्री पूजाही आश्चर्यचकित झाली. व्हिडिओमध्ये ती अभिनेत्यासोबत स्टेजवर उभी असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
सलमानचा हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, जगपती बाबू, व्यंकटेश दग्गुबती, बॉक्सर विजेंद्र सिंह, भूमिका चावला अशी मातब्बर कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.