कॅलिफोर्निया – अनेक लोक कार्टून व्यक्तिरेखांचे चाहते असतात. असे लोक नेहमीच कार्टून्सच्या जादुई जगात जाण्याची इच्छा बाळगून असतात. अशा लोकांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. डिस्ने एक असेच जादुई जग आता वसविणार असून तेथे लोक स्वतःच्या आवडत्या कार्टुन कॅरेक्टर्ससोबत राहू शकतील. या शहराला ‘कोटिनो’ नाव देण्यात आले आहे. कार्टून प्रेमींसाठी हे जगातील सर्वात सुंदर ठिकाण असणार आहे.
या थीम पार्कमध्ये कार्टून प्रेमींना स्वतःच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टर्ससोबत रहावे लागेल. पूर्ण थीम त्याचवर आधारित असणार आहे. पार्कमध्ये 1900 घरांची निर्मिती केली जाणार आहे. येथे राहणाऱयांना कार्टूनच्या जगाचा आभास होईल अशाप्रकारे हे पार्क निर्माण केले जाणार आहे.
असे असणार कोटिंनो शहर
– पार्कमध्ये 1900 घरांची निर्मिती केली जाणार
– 400 खोल्यांचे एक हॉटेल देखील असणार
– कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात असणार शहर
– कोटिनोत राहणे हे स्वप्नांच्या जगात राहण्यासारखेच
– स्वतःला डिस्ने वर्ल्डचा हिस्सा करू शकता