नवी दिल्ली – ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) अंतर्गत इस्रायलमधील भारतीयांना मायदेशी परत आणण्याच्या मोहिमेदरम्यान आज चौथे विमान परत आले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. एकाच दिवसात दुसरे विमान इस्रायलमधील (Israel war) भारतीयांना घेऊन भारतात परत आले असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.(indian from Israel)
आज पहाटेच्या सुमारास 197 भारतीयांना तेल अविवमधून घेऊन निघालेले तिसरे विमान नवी दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यानंतर 234 प्रवाशांना घेऊन आलेले विमान नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. केंद्रीय मंत्री कौशल किशोर (Kaushal Kishor) यांनी विमानतळावर या भारतीयांचे स्वागत केले.
इस्रायलमधील तणावग्रस्त वातावरणामुळे तेथील 18 हजार भारतीयांना परत आणण्यासाठी गुरुवारपासून ‘ऑपरेशन अजय’ सुरू करण्यात आले आहे. इस्रायलमधील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून भारतीयांशी संपर्क साधला जात असून या नियोजनासाठी 24 तास सुरू असलेला नियंत्रण कक्षही तेथे सुरू करण्यात आला आहे.