नवी दिल्ली – नवख्या अफगाणिस्तानने (afganistan ) इंग्लंडवर (england) दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्यांदा बॅटिंगमध्ये कमाल दाखवत अफगाण खेळाडूंनी इंग्लंडच्या टीम समोर विजयासाठी 285 धावांचा डोंगर उभा केला. जो पार करता करता ब्रिटिश टीमची पूर्णपणे दमछाक झाली आणि अफगाणिस्तानने ही मॅच 69 रन्सने जिंकली.(afganistan win agains england)
इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान (ENG vs AFG) संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा 13 वा सामना आज खेळला गेला. राजधानी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये अफगाणी फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा अक्षरशः किस पाडला.(World Cup 2023)
अफगाणिस्तानच्या 285 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात जॉनी बेअरस्टो पॅव्हेलियनमध्ये परतला. रूटही काही विशेष करू शकला नाही आणि 11 धावा करून मुजीबचा पहिला बळी ठरला.डेव्हिड मलानने 32 धावा केल्या. हॅरी ब्रूकने 66 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण मुजीबने त्याची विकेट घेत इंग्लंडचे मनोधैर्य तोडले. अफगाणिस्तानकडून मुजीब आणि रशीदने प्रत्येकी 3 बळी घेतले. मोहम्मद नबीने 2 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवत अफगाण बॅट्समन्सनि दमदार बॅटिंग केली. अफगाणिस्तानच्या गुरबाज आणि झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी रचली. मात्र, यानंतर इंग्लंडने दमदार पुनरागमन करत झटपट विकेट घेतल्या.
गुरबाजने 80 धावांची खेळी केली. शेवटी इकरामने 58 धावांची झटपट खेळी करत अफगाण संघाची धावसंख्या 250 च्या पुढे नेली. मुजीबने 28 धावांची मोलाची खेळी खेळली आणि धावसंख्या 284 पर्यंत नेली.