नगर – तालुक्यातील माळवाडी, शिराढोण येथील महादेव मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रम पत्रिकेवरून दोन गटात तुफान हामाणारी झाली आहे. मारामाऱ्यामध्ये तलवार, लोखंडी पाईपने मारहाण केल्याने तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी 20 ते 25 जणांवर तालुका पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दोन गटामध्ये झालेल्या हाणामाऱ्याच्या घटनेने गावात तणाव निर्माण झाला आहे. याबाबत शिराढोण, माळवाडी येथील रामदास छबुराव वाघ (वय-65) यांनी नगरा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून दादा ऊर्फ गहिनीनाथ किसन दरेकर व इतर 15 ते 20 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.