एक नंबरच्या डाळिंबाला मिळाला 500 रुपये किलो दर
अकलूज – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळींब मार्केटचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 12) करण्यात आले.
यावेळी सराटी येथील संदीप फडतरे व गिरझणी येथील नानासाहेब माने यांच्या डाळिंबाचा लिलाव सर्वसमक्ष करण्यात आला. यावेळी या डाळींबा ला 500 रुपये किलो दर मिळाला. अकलूज मार्केट कमिटीत बाजार समितीने भव्यदिव्य असे दुमजली इमारतीचे उदघाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्केट कमिटीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, सचिव राजेंद्र काकडे यांच्यासह अधिकारी व कामगार यांनी परिश्रम घेतले.
यावेळी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सभापती शोभा साठे, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख, कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, किशोरसिंह माने-पाटील, हरिदास भोसले, आनंद माने, केशव कदम, चंद्रकांत मगर, भाजपचे नेते राजकुमार पाटील, इस्लाम पठाण, आनंद फडे, पंचायत समिती सदस्या हेमा चांडोले, हसीना शेख यांसह अनेक मान्यवर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.