…तरच पोलीस अधिकाऱ्यांना भेटता येईल

  • करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्‍तांच्या सूचना

पिंपरी – करोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्‍तालयातील अधिकाऱ्यांची भेट घ्यायची असेल तर दोन दिवसात करोनाची तपासणी करून रिपोर्ट दाखवावा लागेल, असे आदेश पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी प्रशासनाला दिले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात करोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कोविड प्रतिबंधक लस घेणे अनिवार्य केले आहे. सध्या पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीतील 65 पोलीस कर्मचारी करोना बाधित आले आहेत. त्यापैकी काही जणांनी करोना प्रतिबंधात्मक दुसरी लस घेतली आहे. बाधित होणाऱ्या नागरिक आणि पोलिसांची संख्या लक्षात घेता पोलीस अधिकाऱ्यांनी आणखी काळजी घेण्यास सुरवात केली आहे.

पोलीस आयुक्‍तांना निवेदन देण्यासाठी अनेक शिष्टमंडळ येतात. आयुक्‍तांना निवेदन देताना फोटोही काढतात. त्यावेळी अनेकांच्या तोंडावर मास्क नसतो. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना करोनाची लागण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी करोना चाचणी केली असेल आणि संबंधित व्यक्‍ती करोना बाधित नसल्याचा अहवाल आला असेल तरच त्या व्यक्‍तीला पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेता येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.