पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) – कोरोनामुळे वाहन धारकांची गैरसोय होऊ नये यासाठी आरटीओ विभागाकडून ऑनलाइन वाहन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
त्यानुसार, संचारबंदी लागू होण्यापुर्वी विक्री झालेली परंतु आरटीओत नोंदणी न होऊ शकलेल्या वाहनांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्यास परिवहन आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आहे. याबाबत आरटीओ कार्यालयांना आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर तात्पूरत्या स्वरुपात हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने १४ एप्रिल पासून. १५ मे पर्यंत संचारबंदी लावली आहे. या कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे.
राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांंमध्ये (आरटीओ) देखील केवळ ऑनलाईन पध्दतीने कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात संचारबंदी लागू होण्यापुुर्वी अनेक नागरिकांनी वाहने खरेदी केलेले आहेत.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहने घरी नेणाNया नागरिकांनी अगोदरच वाहने बुक करून ठेवली होती. या वाहनांचे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. मात्र, १४ तारखेपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याने आरटीओ कार्यालयाचे कामकाज बंद झाले. त्यामुळे अशा वाहनांची नोंदणी होऊ शकली नाही.
या वाहनांची नोंदणी व्हावी, यासाठी राज्यातील वाहन वितरकांकडून मागणी करण्यात आली होती. यानूसार अटी व शर्थीच्या अधिन राहून ऑनलाईन पध्दतीने वाहन नोंदणी करण्यास परिवहन आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेश राज्य परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी राज्यातील आरटीओ कार्यालयांना दिले आहेत.
कोरोनामुळे संचारबंदी लागू असेपर्यंत ही सवलत असणार आहे. वाहन वितरकांना वाहन नोंदणीसाठी संबंधीत आरटीओच्या ई मेलवर अर्ज करावा लागणार आहे. तसेच ऑनलाईन अर्ज, विमा, पत्त्याचा पुरावा सादर करावा लागणार असून चॅसीस पेन्सील प्रींट, छायाचित्र देखील जोडावे लागणार आहे.