राजगुरूनगर : राजगुरुनगर येथे आज 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागले. लस उपलब्ध असतानाही टेक्निकल अडचणीमुळे आज कोणालाच लस टोचण्यात आली नाही. लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्स न ठेवल्याने लसीकरणाचा फज्जा उडाला. आरोग्य विभागाने व्यवस्थित नियोजन न केल्याने लस न घेताच रिकाम्या हाती मागे जावे लागले. लस घेण्यासाठी महिलांची संख्या मोठी होती
18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस मिळणार म्हणून अनेकांनी ऑनलाईन नोंदणी केली होती मात्र नोंदणी करताना ती अपूर्ण केली तर खेड तालुका सोडून इतर ठिकाणच्या नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करीत लस घेण्यासाठी राजगुरुनगर केंद्र निवडले मात्र हे नागरिक प्रत्यक्ष केंद्रावर लस घेण्यासाठी आलेच नाहीत तर स्थानिक नागरिकांनी मात्र मोठी गर्दी केली. यामुळे मोठा गोंधळ झाला. शेड्युल झालेले नागरिक हजर नव्हते तर तालुक्यातील लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी केवळ ऑनलाईन नोंदणी केली शेड्युल आणि ठिकाण निवडले नसल्याने त्यांना मागे जावे लागले.
आज लस मिळणार म्हणून राजगुरुनगर येथील मुंबई माता बाल संगोपन केंद्रावर सकाळी 9 वाजलेपासून नागरिकांनी रांगा लावल्या. ट्यांगटार आरोग्य विभागाकडून दुपारी 2 वाजता लसीकरणास सुरुवात होईल असे कळविण्यात आले. त्यामुळे नागरिकांना ताटकळत थांबावे लागले त्यानंतर 3 वाजेपर्यंत टेक्निकल प्रॉब्लेम आला. ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यांचे व्हेरिफेकेशन होत नसल्याने लसीकरण मोहीम आजच्या दिवस थांबविण्यात आली आज 100 डोस देण्यात येणार होते आणि उद्या 100 डोस देण्यात येणार होते हे दोन्ही डोस उद्या (दि. 2) मे ला दिले जाणार आहेत आज ऑनलाईन शेड्युल केलेल्या नागरिकांनी उद्या रिशेड्युल करावे असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. जवळपास 6 तास रांगेत उन्हात थांबूनही लस न मिळाल्याने अनेक तरुण तरुणांनी नाराजी व निषेध व्यक्त केला. तासनतास थांबून नंतर टेक्निलक कारण पुढे करून लस दिली नाही. उद्या तरी टेक्निकल प्रॉब्लेम सोडवून लस मिळावी अशी मागणी केली आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्या अगोदर त्याचे दुपारी 2 वाजता उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, माजी सदस्य अरुण चांभारे, खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, माजी सभापती अंकुश राक्षे, उद्योजक राजू मोहिते, डॉ. पूनम चिखलीकर यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. उदघाटन केले मात्र टेक्निकल अडचण आल्याने लसीकरण आजच्या दिवशी रद्द करण्यात आले.