मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी आपल्या मादक सौंदर्यासह अभिनयामुळे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. सनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, तिचा एक मोठा चाहता वर्ग आहे. मात्र, सतत सोशल मीडियावर सक्रिय असणारी सनी लिओनी आता ऑनलाईन फसवणुकीची बळी ठरली आहे.
आतापर्यंत आपण सामान्य माणसांची फसवणूक झाल्याचे पहिले होते. पण एखाद्या सेलिब्रिटीची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे आपल्या क्वचित लक्षात येते. आणि याच घटनेची शिकार आता सनी लिओनी झाली आहे. कुणीतरी तिच्या नकळत तिच्याच पॅन कार्डचा वापर करून लाखो रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आले आहे.
सनी लिओनीने ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली. ‘माझ्या न कळत माझ्या पॅनकार्डचा वापर करण्यात आल्याने माझा सिबिल स्कोर खराब झाला’ असल्याचं सनी लिओनीने म्हटलं आहे. त्याचबरोबर कर्ज देणाऱ्या कंपनीवरही सीन लिओनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, नंतर तिच्याकडून हे ट्विट डिलीट केले गेले आहे.
दरम्यान, सनीच्या या ट्विटनंतर हे प्रकरण सातत्याने जोर धरत आहे. अशा फसवणुकीला बळी पडलेल्या अनेकांना आता अनेक फोन येत आहेत, तर काही लोकाच्या नावे कारणे दाखवा नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. मात्र, आता सायबर विभाग या प्रकरणावर कश्या प्रकारे दखल घेईल हे पाहणे गरजेचं आहे.