भावीनिमगाव: तालुक्यातील रांजणी येथील अंबादास वसंत काळे यांचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने मृत्यू झाला. काळे यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र गुरुवारी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुणे येथील ससुन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले 20 ते 22 दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काळे यांच्यावर दुपारी तीन वाजता रांजणी येथे शेतातील घरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दहिगाव-ने येथे फोटोग्राफी क्षेत्रात व्यवसाय करत असलेले काळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. फोटोग्राफर विठ्ठल काळे यांचे ते वडील होत.