पुणे -इंग्लंड येथील मॅंचेस्टर येथे होणाऱ्या वरिष्ठ गट तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी प्रविण बोरसेयांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. प्रविण बोरसेहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र येथे तायक्वांदोचे मार्गदर्शन करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत अनेक खेळाडू तयार झाले असून त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत बोरसेयांच्या मार्ग्दर्शनाखाली नियमीतपणे सराव करणारा निरज चौधरी हा पुण्याचा खेळाडू देखील सहभागी झालेला आहे. तसेच बोरसेयांनी या पूर्वी आशियाई अजिंक्यपद स्पर्धा आणि जागतिक कॅडेट स्पर्धेत प्रशिक्षकाची भुमिका बजावली आहे.