सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील आणखी एका संशयित युवकाचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या आता सात झाली असून त्यापैकी एकाचा म्रुत्यू झाला आहे.
करोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील १९ वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. या युवकाच्या घशातील स्त्रावाचे नमुना रिपोर्ट हा कोरोना (कोव्हीड -19) पॉझिटिव्ह असल्याचे पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. त्यामुळे हा युवक करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या रुग्णावर मार्गदर्शक सुचनांनुसार करोना संसर्गाचे उपचार चालू आहेत.