Mihir Kotecha| मुंबईतील मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांचा जोरदार राडा झाला. शुक्रवारी (17 मे) मुलुंड येथील मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. कोटेचा यांच्या कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. यावेळी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी, करण्यात आली, तसेच यावेळी धक्काबुक्की झाल्याचेही म्हंटले जात आहे.
यानंतर तातडीने कोटेचा यांच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचा आढावा घेतला. या घटनेनंतर काही काळ येथे तणावाचे वातावरण होते. हा सर्व प्रकार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळच झाला. यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी करुन मारहाण करायला सुरुवात केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
काय म्हणाले प्रसाद लाड?
यासंदर्भात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मिहीर कोटेचा यांच्या मुलूंडमधील कार्यालयावर जो हल्ला करण्यात आला, तो भ्याड हल्ला होता. यावेळी महिलांवरही हल्ला केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती महिलांवर हल्ला करणे शिकवत नाही. संजय पाटलांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे अशा प्रकाराचा हल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. असा हल्ला सहन केला जाणार नाही. ज्यांच्याबरोबर गुंड प्रवृत्तीचे लोक फिरत आहेत त्यांच्याकडून अपेक्षाच ही आहे. ठाकरे गटाने केलेले आरोप खोटे आहेत. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो”, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोग त्यांचे काम करत नाही – आदित्य ठाकरे
यावर आदित्य ठाकरे म्हणले, “मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते. आमच्या लोकांनी पोलिसांना बोलावलं मात्र पोलीस आले नाही. या प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेले आहेत. जे काम निवडणूक आयोगाचा आहे ते करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. पुण्यात देखील असा प्रकार घडला होता. त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आंदोलनाला बसले होते. निवडणूक आयोग त्यांचे काम करत नाही त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागतं आहे.”
याप्रकरणी मिहीर कोटेचा यांनी “निवडून आल्यानंतर तुमचे सगळे काळे धंदे, ड्रग्ज, मटका, गुटखा हे बंद करणारच. मानखुर्दचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करणारच”, असा इशारा संजय दीना पाटील यांना दिला.
हेही वाचा:
‘गौ माता की जय, जय श्री राम…!’ कन्हैया कुमारला चापट मारणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ शेअर करत दिली घोषणा