चिंबळी-करोनामुळे चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे परिसरातील सर्व दुकाने दुपारी एक नंतर बंद ठेवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे चिंबळी येथील भैरवनाथ महाराजांची यात्रा दि. 12 व 13 रोजी होणार नसून कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणयात आले नाहीत. कुरूळी येथील भैरवनाथ महाराजांची यात्रा 15 व 16 रोजी असल्याने रद्द करण्यात आली आहे. यात्रा बंद ठेवून जमाव बंदी करू नये, असे आदेश चाकण व आळंदी पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आले आहेत.